पुणे;- संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती कोरोनाची रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राज्यभरात सुरू आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्र कधी सुरू तर कधी बंद असं चित्र पाहायला मिळत होतं. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आजपासून 111 केंद्रांवर 45 वर्षांच्यावरील नागरिकांचं लसीकरण होणार असल्याची माहिती दिली आहे. तर 6 केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.