महाबळ, रामानंद नगर परिसरात मतदारांचा उदंड प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी): आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रभाग १२ ‘अ’ चे अधिकृत उमेदवार ललितकुमार घोगले यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.”केसरीराज” ने काही नागरिकांच्या प्रचारफेरीत प्रतिक्रिया जाणून घेतल्या.


प्रभाग १२ ‘अ’ मधील नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया
“आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवा आहे जो सुशिक्षित असेल आणि प्रभागातील प्रश्नांची तांत्रिक जाण ठेवत असेल. ललितकुमार घोगले हे अतिशय संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. प्रभागातील ड्रेनेज आणि अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न तेच मार्गी लावू शकतात, असा आम्हाला विश्वास आहे.” — आशिष देशपांडे, महाबळ कॉलनी, जळगाव.
“ललितभाऊ हे तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. खेळाची मैदाने आणि डिजिटल लायब्ररी यांसारख्या आधुनिक सुविधांसाठी त्यांचे व्हिजन आम्हाला पटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून ते नक्कीच बदल घडवतील.” — अक्षय पाटील, महाबळ, जळगाव.

“रामानंद नगर परिसरात पथदिवे आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. ललितकुमार घोगले यांनी प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांवर आम्हाला विश्वास आहे. ते नेहमीच सर्वसामान्यांच्या फोनला प्रतिसाद देतात, म्हणूनच आमचा पाठिंबा तुतारीलाच आहे.” – सुवर्णाताई पाटील, रामानंद नगर, जळगाव.
“गेल्या अनेक वर्षांपासून गिरणा टाकी परिसरातील काही समस्या प्रलंबित आहेत. ललितकुमार घोगले हे नवीन विचारांचे उमेदवार आहेत. शरद पवार साहेबांच्या विचारांचा वारसा आणि ललितभाऊंची कार्यक्षमता यामुळे प्रभागाचा कायापालट होईल याची आम्हाला खात्री आहे.” – जी. डी. महाजन,शास्त्री नगर जळगाव.









