• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लखपती दीदी मेळाव्यात निष्काळजीपणा उघड : सरकारी कार्यक्रमातून आमदारालाच डावलले..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

आयोजक ग्रामविकास मंत्र्यांनी हसून टाळला विषय, कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात आज रविवारी दि. २५ रोजी मोठ्या थाटात लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही अनेक मंत्री व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. मात्र या भव्यदिव्य कार्यक्रमात सरकारी निष्काळजीपणा उघड झाला आहे. विधानपरिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांना निमंत्रणच पाठविले गेले नसल्याचे खुद्द आ. खडसेंनी सांगितल्यामुळे “प्रोटोकॉल” भंग झाल्याचे दिसून आले. तर याबाबत आयोजक असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी हसून विषय टाळला. यामुळे खडसेंच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

जळगावमधील कार्यक्रमात केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेंतर्गत ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे वाटप केली जाणार होती. याशिवाय बचत गटांसोबत काम करणाऱ्या महिलांना लाभ देण्यासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाणार होता. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा महत्त्वाचा दौरा मानला जात होता. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील महायुतीचे सर्व मंत्री उपस्थित राहिले. मात्र ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. एकनाथ खडसेंची अनुपस्थिती तिथे जाणवली.

दरम्यान, शासकीय कार्यक्रम असल्याने जिल्ह्यातील सर्व आमदारांना रितसर निमंत्रण देणे बंधनकारक होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील आ. खडसेंना कुठलेही पत्र नाही. मला या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नाही. वेळेत निमंत्रण मिळाले असते तरी मी कार्यक्रमाला गेलो असतो. आता निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लखपती दीदी हा शासनाचा कार्यक्रम होता, मी शासनाचा एक प्रतिनिधी आहे . तरीही मला लखपती दीदी या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही. मी या कार्यक्रमासंदर्भात परवा जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो होतो. ते बोलले होते निमंत्रण येईल पण सदर कार्यक्रमाचे निमंत्रण आतापर्यंत आलेच नाही.

सदर या कार्यक्रमाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची होती. जाणीवपूर्वक मला डावलले गेले असले पाहिजे अशी खंत आ. एकनाथराव खडसे यांनी “केसरीराज”शी बोलतांना व्यक्त केली. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी विचारले असता, त्यांनी हसून विषय टाळत, हात जोडून, चला धन्यवाद असे म्हणून निघून गेले. ग्रामविकास मंत्र्यांच्या या कृतीबद्दल खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर आ. एकनाथ खडसेंना डावलण्यामागे नेमके कारण काय हे आता गुलदस्त्यात आहे.


 

 

Tags: #aa.eknath khadse-news #nagpur #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बारी विद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात, विद्यार्थ्यांनी सादर केल्या प्रतिकृती

Next Post

‘स्वाद’ आणि ‘विवाद’ या पासून दूर रहा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

‘स्वाद’ आणि ‘विवाद’ या पासून दूर रहा - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon