जळगाव ( प्रतिनिधी ) – लखीमपूर शेतकरी हत्याकांडाचा व प्रियांका गांधी यांना केलेल्या बेकायदा अटकेचा आज जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील टॉवर चौकात प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने केली केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या राजीनाम्याची मागणीही जळगाव जिल्हा व शहर काँग्रेसने केली आहे
यावेळी माजी खासदार डॉ उल्हास पाटील म्हणाले की , केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आपल्या वहानाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडले या शाहिद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी जात होत्या त्यांना लखनौत बेकायदा ताब्यात घेऊन प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे खासदार जितेंद्र हुंडा यांच्याशीही असभ्य वर्तन पोलिसांनी केले आता आमच्या मागण्या आहेत की केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची आणि भूमिकेची आता सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल घ्यावी व न्याय द्यावा या मंत्र्याने राज्यघटनेच्या विरोधात जाऊन आदेश दिला होता याची दखल न्यायालयाने घ्यावी आंदोलक शेतकरी सुदाहरणार नसतील तर आम्ही त्यांना सुधारू असे विधान या मंत्र्याने केले होते आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली प्रियांका गांधी यांना मुक्त करून लखीमपूर आणि शहीद शेतकऱ्यांच्या वारसांना भेटायला जाऊ द्यावे त्यांच्या वारसांना जास्तीत जास्त भरपाई सरकारने द्यावी







