जळगाव शहरातील गोपाळपुरा भागात घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गोपाळपुरा परिसरातील लाकडी सामान बनविणाच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी १८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. या आगीत अंदाजे २ लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
शेख परवेज शेख सलीम (वय २९, रा. जळगाव) हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. लाकडापासून लाटणे व पोळपाट बनविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या घराजवळच त्यांचे लाकडी सामान बनविणाचे एसएस ट्रेंडींग नावाचे दुकान आहे. शुक्रवारी १८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्याच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील मशीनरी, तयार लाकडी वस्तू व इतर साहित्य जळून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.