गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने डॉ. केतकी पाटील सेमिनार हॉल येथे लैंगिक समानता व लोकसंख्या वाढीचा संसाधनांवर परिणामावर पॉडकास्टच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके तर निवेदीका म्हणून गोदावरी नर्सिंगच्या प्रा.दिवायना पवार या उपस्थीत होत्या.डॉ. वारके यांनी लैंगिक समानतेचे महत्त्व, समाजातील असमतोलाचे दुष्परिणाम आणि लोकसंख्यावाढीचा जागतिक संसाधनांवरील वाढता ताण यावर बौध्दीक चर्चा करण्यात आली. या पॉडकास्टच्या माध्यमातून बौद्धिकता, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाची प्रेरणा यांचे मिश्रण दिसून आले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक समतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा घेतली. दमदार निवेदन आणि तितकेच सडेतोड उत्तरांच्या माध्यमातून प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न या पॉडकॉस्ट मधून करण्यात आला.