पाचोरा तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करेल,’ असे गोड बोलून एका तरुणाने अल्पवयीन तरुणीसोबत लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या पोटात काही दिवसांपासून दुखत होतं. तिने आपल्या आईला याबाबत सांगितलं. आईने मुलीला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पाचोरा तालुक्यातील एका गावातील तरुणाने अल्पवयीन मुलीस ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करेल,’ असे गोड बोलून आरोपी तरुणाने १ एप्रिल ते २७ ऑगस्ट दरम्यान वेळोवेळी त्याच्या राहत्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती केले, अशी फिर्याद पीडित मुलीने दिली.
त्यावरून पाचोरा पोलिसात संशयित आरोपी अतुल भाऊसाहेब मोरे (वय २४, रा. टाकळी बुद्रूक, ता. पाचोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत. दरम्यान, २७ ऑगस्ट २०२५ रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीचा जवाब पोलिसांनी घेतला.