यावल तालुक्यातील तरुणाने केला गैरप्रकार
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दुसखेडा येथील तरुणाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अल्पवयीन मुलीला चेतन अमोल सोनवणे (रा. दुसखेडा, ता. यावल) याने लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला पळवून मुक्ताईनगरच्या जंगलात नेले. तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार या मुलीने आपल्या कुटुंबात सांगितल्यानंतर फैजपूर पोलिस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध फैजपूर पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पो. नि. रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहेत.