मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) – एका ॲप’च्या माध्यमातून अमरावतीच्या ३१ वर्षीय युवतीची मुक्ताईनगरातील युवकाशी मैत्री झाल्यानंतर युवकाने गेल्या पाच महिन्यांपासून लग्न करतो अशा थापा मारून अत्याचार केले. यामुळे युवतीने पोलिसांत धाव घेत सदर युवकावर गुन्हा दाखल केला.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, अमरावती शहरातील ३१ वर्षीय तरुणी एका रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘हॅलो यू ॲप’च्या माध्यमातून तरूणीची मुक्ताईनगर येथील भूषण संजयराव तायडे (वय-३१) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर झाले. याचा गैरफायदा घेत भूषण तायडे याने तरुणीला २३ एप्रिल २०२१ रोजी कार पाठवून तरूणीला मुक्ताईनगर येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केले. मुलाच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने आरोपी भूषण हा अमरावतीला भाड्याच्या घरात राहिला . त्या दरम्यानही त्याने पीडिताशी संबंध प्रस्थापित केले. आणि कागदपत्रे आणण्याच्या बहाण्याने निघून गेला. दरम्यान पीडिता ही भूषण तायडे याच्या घरी गेली असता भूषणच्या आई वडीलांनी पिडीतेला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीने अमरावती शहरातील फैजरपुरा शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.