तहसीलदार, बिडीओ, आ. पाटील यांना निवेदन
भडगाव ( प्रतिनिधी ) – मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या व सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना, शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर कालावधी वाढवून मिळावा या मागणीचे निवेदन भडगाव तहसीलदार, गट विकास अधिकारी, पाचोरा भडगाव मतदार संघाचे विद्यमान आ. किशोर पाटील, प्रांत अधिकारी यांच्यामार्फत निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार आमचा कालावधी वाढून मिळावा असा व राज्यात प्रगतीत योगदान देणारे असल्याने योजनेचा हेतू पूर्ण करून भविष्याची दिशा निश्चित करावी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मागण्या सरकारकडून मान्य करावेत, असे निवेदन पाचोरा भडगाव येथील तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
निवेदनावर भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे प्रशिक्षणार्थी चेतन महाजन, कल्पेश अहिरे प.स. भडगांव संदीप पाटील ,चेतन पाटील सुभाष पाटील, विजयानंद पाटील तुषार पाटील, जयेश महाजन, नितीन पाटील, नेहा तिवारी, हर्षा राजपूत आकांक्षा सोनवणे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.