रावेर तालुक्यातील खेडी येथील उपक्रम
रावेर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांना शासकिय योजनांचा लाभ व्हावा म्हणून शासन निर्णयानुसार महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “महसूल पंधरवडा-२०२४”साजरा करण्याच्या उद्देशाने खिर्डी येथे महसूल मंडळात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना” या बाबत शिबीर घेण्यात आले.
महिलांना या योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी मंडळ अधिकारी प्रविण नेहेते,तलाठी,कोतवाल,सरपंच, ग्रामसेवक,ग्रा.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.