जामनेर (प्रतिनिधी) : महायुती सरकारच्या वतीने राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी जामनेर येथील मंत्री गिरीष महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत नोंदणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी नोंदणी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघातील सर्व माता – भगिनींनी या मोफत नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष साधना महाजन यांनी केले आहे.