पाचोरा ( प्रतिनिधी ) – लढण्याची धमक ठेवा, यश हमखास मिळेल असा सल्ला आज पाचोऱ्याचे डी. वाय. एस. पी. ईश्वर कातकडे यांनी स्पर्धा परीक्षेची आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना दिला

येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पाचोऱ्याचे डी. वाय. एस. पी. ईश्वर कातकडे म्हणाले की, लढण्याची धमक असेल तर यश हमखास मिळते, विनासायास काहीच साध्य होत नाही यासाठी स्वप्ने मोठी बघा आणि ती सत्यात उतरवा. पोलीस खात्यामध्ये गुणवंतांना हमखास यश मिळते यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे, यश हे जात, धर्म, पंथ, श्रीमंत-गरीब बघत नसते तर योग्य प्रयत्न करणाऱ्यांना हमखास साध्य होते असेही ते म्हणाले
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अडचणी येत असतील त्यांच्या पाठीशी आमची संस्था केव्हाही उभी असेल.
याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, शशिकांत चंदिले, सतीश चौधरी, प्रा. राजेंद्र चिंचोले, डॉ. बी. एन. पाटील, प्रा. जी. बी. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. स्वप्नील भोसले आदी उपस्थित होते. या शिबिरात मार्गदर्शन करणारे प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. जी. एन. पाटील, योगेश शिंपी, डी. बी. कोळी, दीपक पाटील, डॉ. सचिन भोसले, महेश चिंचोले, एल. जी. कांबळे यांचा संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिबिरातील निलेश राठोड, चेतन महाजन, साक्षी पाटील, रूपाली पाटील, इंदिरा देवरे, यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने आयोजित स्पर्धांचे पारितोषिकही वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. माणिक पाटील यांनी मानले.







