जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एकुण ३७ सापळा कारवाई यशस्वी
जळगाव (प्रतिनिधी) :- मागील वर्षी सन २०२४ मध्ये जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एकुण ३७ सापळा कारवाई करण्यात आल्या असून एकुण ६० लाच घेणाऱ्या व्यक्तीवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असून विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या संपुर्ण ६० संशयित आरोपीमध्ये जळगांव घटकाकडील वर्ग १ चे ४, वर्ग २ चे १, वर्ग ३ चे ३०, वर्ग ४ चे ६, इतर लोकसेवक ६ व खाजगी इसम १३ यांचा समावेश आहे.
वर्षभरात महसुल विभागात ७ कारवाई मध्ये ११, जिल्हापरिषद विभागात ७ कारवाई मध्ये १४ संशयित आरोपी, पोलीस विभागात ५ कारवाई मध्ये ८, विज वितरण विभागात ४ कारवाई मध्ये ८, उद्योग उर्जा व कामगार विभागात २ कारवाई मध्ये २, शिक्षण विभागात २ कारवाई मध्ये २, सरपंच २ कारवाई मध्ये ५, इतर लोकसेवक २ कारवाई मध्ये २, खाजगी २ कारवाई मध्ये २ इसम, आर.टी.ओ विभागात १ कारवाई मध्ये २ संशयित, दारुबंदी विभाग १ कारवाई मध्ये २, म.न.पा. विभागात १ कारवाई मध्ये १, बी.एच.आर.पतसंस्था १ कारवाई मध्ये २ आरोपी अशा विविध विभागात कारवाई केली आहे. अशा प्रकारे एकुण ३७ सापळा कारवाई मध्ये ६० संशयित आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सन २०२३ च्या मध्ये ३२ गुन्हयांमध्ये ५१ आरोपीतांवर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली असुन सन २०२४ मध्ये ३७ गुन्हयामध्ये ६० आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे. सन २०२३ च्या तुलनेत सन २०२४ मध्ये अधिक ०५ ने वाढ झाली आहे. सदरची कारवाई शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव घटकातील अधिकारी व अंमलदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव युनिट तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. कार्यालयीन वेळेनंतर वा सुटीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली बाबत व तकारी बाबत माहीती पाहीजे असल्यास खालील नमुद मोबाईल कमांक व दूरध्वनीवर संपर्क साधावा. महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार करण्यासाठी लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असुन सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तकारी संबंधी नागरीकांनी संपर्क साधावा.