जळगाव.( प्रतिनिधी ) – कंत्राटदाराकडे त्याने केलेल्या कामांच्या बिलांचे धनादेश काढण्यासाठी १ लाख १५ हजार रुपयांचं लाचेची मागणी करणाऱ्या रावेरच्या
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तक्रारदार औरंगाबाद येथील कंत्राटदार आहेत . त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली . या कंत्राटदाराने वन विभागाकडुन रावेर तालुक्यात ए.एन.आर रोपवन अंतर्गत चेनसिंग, फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-निवेदेव्दारे ( १.पाल क.नं.५५, २.लोहारा क.नं.२४ व ३. जिनसी क.नं.९ ) मिळवलेले होते. तीनही कामांपैकी पाल क.नं.५५ हे काम पुर्ण झाले या कामाचा 2 , 6 0 ,0 00/- रूपयांचा धनादेंश त्यांना मिळालेला आहे . लोहारा क.नं.२४ चे काम पुर्ण झाले परंतु कामाचा त्यांना धनादेश मिळालेला नसुन पाल व लोहारा या दोन्ही कामांचे ५% प्रमाणे पैसे द्यावे लागतील म्हणुन पाल क.नं.५५ या कामाचा धनादेश दिलेला आहे असे सांगत या कामासाठी रावेरचे वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश महाजन यांनी ५% प्रमाणे तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष प्रथम 1,30,000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1,15,000/- रुपये लाचेची २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी मागणी केली होती कारवाईनंतर आज १८ जानेवारीरोजी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला
लाचालूंचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अप्पर पोलीस अधिक्षक एन.एस.न्याहळदे , पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे , जळगावचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.