धरणगाव (प्रतिनिधी ) –दोन हजार रुपयांची लाच घेतांना गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाल सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि विभगातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. गट साधन केंद्र, पंचायत समिती धरणगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून तुळशीराम सैंदाणे याने २ हजार रूपये घेतांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोनाजनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.