जळगाव ( प्रतिनिधी) – आरटीओ अधिकार्यांच्या नावाने वाहन मालकाकडून दहा हजारांची लाच स्विकारताना दोन दलालांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
खेडी बु॥ (ता. जि.जळगाव) येथील एका एकोणीस वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारी वरून हा सापळा रचण्यात आला होता. शुभम राजेंद्र चौधरी, ( वय २३, व्यवसाय आरटीओ एजंट , रा. कोल्हे हिल्स गॅस गोडाऊन जवळ. जिजाऊ नगर, जळगाव ) व राम भिमराव पाटील,( वय -३७, व्यवसाय आरटीओ एजंट , रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ,जळगाव) अशी या आर टी ओ एजंटाची नावे आहेत. या एजंटानी २३ नोव्हेंबर रोजी या १०हजार रकमेची मागणी केली होती. आजच त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली.
तक्रारदार यांनी साधारण प्रवासी बस विकत घेतली असून ती बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात आरोपीनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांचे नावे पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १०,०००/ – रुपये लाचेची मागणी केली . मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतःआरोपी शुभम चौधरी याने आरटीओ कार्यालय जळगावचे आवारात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील, पो नि संजोग बच्छाव, स. फौ. दिनेशसिंग पाटील, स. फौ. सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहीरे, सुनिल पाटील, .रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.