जळगाव ( प्रतिनिधी ) – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस “सेवा समर्पण” सप्ताह म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला गेला. सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. तसेच केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना ची माहिती, त्या योजनांचा लाभ कश्या पद्धतीने घेता येईल. त्यासाठी लागणारे कागदपत्र या बाबत संपूर्ण माहिती लाभार्थी यांच्या पर्यन्त पोहचविण्याचे कार्य ह्या सप्ताह अंतर्गत करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवा व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जी. एम. फॉऊंडेशन चा यात मोलाचा वाटा आहे. जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी लसीकरण मोहीम व सामाजिक उपक्रम जी. एम. फॉऊंडेशन च्या माध्यमातून राबविले गेले. त्यात केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना ‘’पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजनेचा” चा लाभ मिळवून देण्यासाठी जी. एम. फॉऊंडेशन च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. योजने अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी साठी २०१३ लाभार्थी जळगाव शहरातून आता पर्यन्त पात्र झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष १७६८ लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे, तसेच जामनेर शहरातून ३१३ लाभार्थी पात्र झाले आहेत तर प्रत्यक्ष २६१ लोकांना योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे.
पाचोरा शहरातून आतापर्यंत ३२२ लाभार्थी पात्र करण्यात आले आहेत, तर १५८ लोकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. जी. एम. फाऊंडेशन च्या माध्यमातून जळगाव, जामनेर, पाचोरा या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात जळगाव शहराची जबाबदारी होनाजी चव्हाण, जामनेर शहराची जबाबदारी आतिष झालटे व पाचोरा शहराची जबाबदारी अमोल शिंदे यांना सोपविण्यात आली. पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेतलेल्या साठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या सेवा समर्पण सप्ताहच्या निमित्ताने “लाभार्थी सन्मान दिवस” राबविला जात आहे. त्या अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थी चा पत्र देवून सन्मान करण्यात येत आहे. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते जळगाव येथील जी. एम. फौंडेशन येथे प्रातनिधिक स्वरूपात लाभार्थी श्री. हरिष घनश्याम जैसवाल व श्री. गणेश विष्णु नाथजोगी यांचा सन्मान करन्यात आला. या प्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, नगराध्यक्ष करणदादा पवार, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, माजी नगरसेवक किशोर चौधरी, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, सुधीर पाटील, आरोग्यदूत अरविंद देशमुख, पितांबर भावसार, अतुलसिंह हाडा, विशाल महाजन, पराग महाशब्दे व इतर उपस्थित होते.