एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील रिंगणगाव येथे कुटुंबीय त्यांच्या मुलाला भेटण्यास दुसऱ्या तालुक्यात गेले आता चोरटयांनी घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीस नेला. याप्रकरणी एरंडोल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रिंगणगावातील रहिवासी दत्तात्रय पंढरीनाथ माळी हे आपल्या कुटुंबासह दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी धरणगाव येथे त्यांच्या मुलाकडे गेले होते. मात्र रात्री चोरट्यांनी पाच दरवाजाचा ग्रॅम कडीकोयंडा तोडून ३ ग्रॅमची अंगठी, कानातील डोंगल, दोन भार सोन्याचा तुकडा, २० भार चांदी व १ लाख ६० हजार रुपये रोख असे दागिने व पैशांवर चोरांनी डल्ला मारला. हे कुटुंब धरणगावून परतले असता दि. १४ रोजी संध्याकाळी ही घटना उघड झाली. चोरीच्या घटनेनंतर एरंडोल पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. श्वानपथक व फॉरेन्सिक टिमच्या कर्मचाऱ्यांनीही मागोवा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसे यश आले नाही. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.