अमळनेर तालुक्यातील मांजर्डी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा माल चोरट्याने लांबवल्याची घटना दिनांक २१ ते २३ दरम्यान तालुक्यातील मांजर्डी येथे घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मांजर्डी येथील सुकलाल भीमराव बिऱ्हाडे हे २१ रोजी सकाळी साडे १० वाजता घराला कुलूप लावून नातेवाईकाच्या लग्नाला दोंडाईचा येथे गेले होते. दिनांक २३ रोजी सायंकाळी ६ वाजता घरी परत आले, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील किचन मधील धान्याच्या कोठीतील ४० हजार रुपये रोख आणि ९ हजार रुपये किमतीचे ३ ग्राम सोन्याचे कर्णफुले, ६ हजार रुपये किमतीचे २ ग्राम सोन्याचे मणी मंगळसूत्र दिसून आले नाही. सुकलाल बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.