जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा शिवारातील गजानन पार्क येथे घरातील सदस्यांची बदनामी करत असल्याच्या संशयावरून एका तरूणावर धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना १६ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे शत्रुघ्न त्र्यंबक तायडे (वय ४०) हा तरूण घरातील सदस्यांची गावात बदनामी करत असल्याचा संशयावरून गावातील राज भास्कर कोळी याने गुरूवारी दि. १६ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता राज कोळी याला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार वस्तूने शत्रुघ्न यांच्यावर वार करून जखमी केले. ही घटना घडल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार राज भास्कर कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी हे करीत आहे.