गृहमंत्र्यांना स्वलिखित ‘मृत्यू घराचा पहारा’ पुस्तकाची प्रत दिली भेट.

जळगाव (प्रतिनिधी )- जळगाव जिल्हा पोलिस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे, गेल्या सहा महिन्यापासून जळगाव कोरोना कक्ष येथे कार्यरत आहेत. त्यांना एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या कोरोना कक्षातील 21 दिवसांच्या अनुभवांचे,कोरोना योद्धांच्या वेदनेचे, मे महिन्यांमध्येच देशातील पहिले पुस्तक ‘मृत्यू घराचा पहारा’ या नावाने लिहून काढले दी.१/११/२०२०रोजी अमळनेर येथील पोलीस वसाहत कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस नाईक विनोद अहिरे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस महानिरीक्षक प्रकाश दिगावकर, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, आमदार चिमणराव पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थितीत गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ‘मृत्यू घराचा पहारा’ पुस्तकाची प्रत भेट दिली.
जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले, पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे गेल्या सहा महिन्यापासून जळगाव कोरोना कक्षाची ड्युटी करीत आहेत. दि.21/4/2020 रोजी अहिरे यांची प्रथमच कोरोना कक्षात ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळेस कोरोणाची जनमानसात प्रचंड दहशत होती त्यात पोलीस दलही अपवाद नव्हते. त्यामुळे श्री अहिरे देखील कुटुंबीयांच्या काळजीने प्रचंड भयभीत झाले होते.
त्यांनी प्रकाशनापूर्वीच आपली पहिली प्रत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली आहे. ते म्हणाले की,माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विशेष प्रभाव असल्याने माझे विचारही तसेच आहेत. त्यांच्या विचारांमुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो.
वेदना ह्या साहित्याचा केंद्रबिंदू आहेत. साहित्य हे वेदनेभोवतीच फिरत असते. मला फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची लाभ लावलेली थोडीफार साहित्य दृष्टी मला नेहमी प्रेरणा देत असते…. म्हणूनच हे पुस्तक मी लिहू शकलो. या पुस्तकाच्या मुळाशी माझी वेदनाच आहे. फक्त मी त्या वेदनेचा बाजार न मांडता त्याऐवजी मी लिखाणाने ती वेदना शमवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे. असेही श्री अहिरे म्हणाले.







