जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलिसांनी आज दुपारी कुसुंब्याच्या सुरेशदादानगर झोपडपट्टी भागात टाकलेल्या धाडीत १२५० रुपयांची हातभट्टीची दारू जप्त करून आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पो.कॉ. सिध्देश्वर डापकर यांनी एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , आज त्यांच्यासह पोउनि अनिस शेख, पोहेकॉ गफार तडवी, पोकों शांताराम पाटील, मपोकों आलका माळी यांना पोनि प्रताप शिकारे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली . सुरेशदादानगर झोपडट्टी भागात कुसुंबा गावी आशा सोनवणे तिचे घराच्या आडोशाला बेकायदा हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दुपारी १ वाजता वाजता पोलिसांनी छापा टाकला मपोकों आलका माळी यांनी पकडल्यावर चौकशी केल्यांनतर आशा विकास सोनवणे ( वय-३२ , रा.सुरेशदादानगर कुसुंबा ) हिच्या कब्जामधून प्लॅस्टीक कॅन व १,२५०/- रुपये किमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु जप्त करण्यात आली . तपासणीसाठी नमुना वेगळा काढून उर्वरीत दारु पंचासमक्ष जागीच नाश केली आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीविरोधात म.प्रो. अॅक्ट कलम ६५ ( ई ), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .