जळगाव (प्रतिनिधी) – कुसुंबा परिसरातील जळगाव टोलनाक्याजवळ दोन जणांच्या गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी एका फरार संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
जळगाव टोल नाक्याजवळ किरण खर्चे व विशाल अहिरे यांच्या गटात १३ सप्टेंबर रोजी जोरदार हाणामारी झाली होती. यातील किरण खर्चे याने दिलेल्या फिर्यादींप्रमाणे संशयित आरोपी राकेश भीमराव सपकाळे (रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलोनी ) हा फरार होता. राकेश मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागसेन नगर येथे येत असल्याची माहिती पोकॉ. मुकेश पाटील यांना मिळाली होती त्यानुसार पोउनि. विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आनंदसिग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय बावसकर, हेमंत खडतर, चंद्रकांत पाटील यांनी त्याला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. रविवारी त्याला न्यायालयात हजार केले असता, ३० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.