जळगाव ;- जामनेर तालुक्यातील कुऱ्हाड गावात माजीमंत्री आणि आ. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक दिवसांपासून कुऱ्हाड गावामध्ये कोरोनाविषयी जनजागृती आणि ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांकडे लक्ष गेल्या अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून कुऱ्हाड गावाची वाटचाल कोरोना मुक्तीकडे झाली असून राजकीय मतभेद बाजूला ठेऊन कुऱ्हाड पॅटर्न यशस्वी झाला असल्याची माहिती आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी बोलताना दिली.
राजकारण बाजूला ठेऊन सर्वच पक्षातील लोकांचे यश असून सर्वांच्या प्रयत्नामुळे यश आल्याचे अरविंद देशमुख यांनी सांगत गावातील लोकांनी कोरोनाविरुद्ध लढा देऊन कुऱ्हाड पॅटर्न यशस्वी झाल्याचे श्री. देशमुख यांनी बोलताना सांगून सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.