जळगाव शहरात रणछोड नगरातील व्यापाऱ्याच्या घरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक घटनास्थळी होते.
सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. (केसीएन)दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.
दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. रात्री उशिरा महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये देण्यात आला आहे.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.