अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील शिरुड नाका परिसरात मुलाने किरकोळ कारणावरून सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्याचा खून केल्याची घटना दि. ३१ रोजी रात्री साडे नऊ वाजेपुर्वी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलाला अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ६५) हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती ऋत्विक भामरे याने पोलिस अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे याना सांगितली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज, समाधान गायकवाड, हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी , मिलिंद सोनार, नितीन मनोरे, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील यांनी भेट दिली. राजेंद्र रासने यांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना विचारले असता राजेंद्र याचा मुलगा भूषण राजेंद्र रासने यानेच त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून मारले अशी माहिती मिळाली. फॉरेन्सिक पथकाने घटनस्थळवरून काही नमुने घेतले व लोखंडी हातोडी जप्त करण्यात आली. अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून भूषण राजेंद्र रासने (वय ३६) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.









