अमळनेर तालुक्यात जानवे येथील घटना ; घटनास्थळी मिळाले कपडे, आधारकार्ड, जोडवे !
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी व हाडे अमळनेर पोलिसांना मिळाली आहेत. अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथून हरविलेल्या महिलेचा हा मृतदेह असण्याची दाट शक्यता पोलीस तपासातुन दिसत आहे. घटनास्थळी हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड, कपडे भरलेली बॅग आणि चांदीचे जोडवे आढळून आले आहे. अमळनेर पोलीस पुढील तपास करीत आहे.
जानवे जंगलात बकऱ्या चारणाऱ्या गुरख्यांना एक कवटी, काही हाडे दिसून आली. त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना कळवताच त्यांनी हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांचेसह घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या परवानगीने फॉरेन्सिक पथक बोलावून घेतले.(केसीएन)घटनस्थळवरून हाडे, केस, वस्तू व काही नमुने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक
समाधान गायकवाड, काशिनाथ पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, सागर साळुंखे आदिनीही भेट देऊन पंचनामा केला व आजूबाजूचे नमुने घेतले.
दरम्यान, वैजंताबेन भगवान भोई (वय ५०, रा. कुबेरनगर, कतार गाम दरवाजा,सुरत) या महिलेचे आधार कार्ड घटनास्थळी आढळून आले. तसेच कपड्याने भरलेली बॅग व चांदीचे जोडवे वैजताबेन ही महिला दि. १७ मे २०२५ पासून बेपत्ता झाली होती. सुरत येथे बाजारपेठ पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तूर्त अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेऊन तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.