कुकाणे (प्रतिनिधी) – माती परीक्षण प्रक्रिया,बीज प्रक्रिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ खत निर्मिती, शेती क्षेत्रात ॲप्सचा वापर, एकात्मिक तण व्यवस्थापन, फळप्रक्रिया, फळपिकाची कलम याविषयी पाथरवाला येथील शेतकऱ्यांना थेट शेतीच्या बांधावर मार्गदर्शन करून आदेश खाटीक या कृषी युवकाने प्रात्यक्षिक करून दाखविले.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेले बाबुळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी त्याने कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यनुभव या कार्यक्रमाअंतर्गत शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना थेट शेतीच्या बांधावर दिली.
या अभ्यास दौऱ्यात खाटीक यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ खत निर्मिती, शेती क्षेत्रात ॲप्सचा वापर, एकात्मिक तण व्यवस्थापन फळप्रक्रिया, फळपिकांचे कलम याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंदराव खाटिक, सुरेश साळुंखे, निवृत्ती थोरे, प्रकाश केदार, मच्छिंद्र पवार, सोपान गवळी, अनिल खाटीक, भूषण केदार, अशोक वैरागर आदी उपस्थित होते.







