नूतन मराठा महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या “क्षितिज” या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्य, नाट्य, गायन अशा विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले. प्रसंगी गुणवंत व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
“क्षितिज” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन महाविद्यालयचे माजी विद्यार्थी कलावंत अनिल मोरे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, संमेलनप्रमुख प्रा.डॉ राहुल संदनशिव, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. बी. पाटील,प्रा.संजय पाटील, प्रा.डॉ एन जे पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन झाले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन उकृष्ट व्यासपीठ असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ अफाक शेख व प्रस्तावना प्रा.डॉ.राहूल संदनशिव यांनी केली. आभार उपप्राचार्य प्रा.संजय पाटील यांनी मानले.
समारोपाला महाविद्यालयाचे माजी गुणवंत विद्यार्थी छत्रपती पुरस्कार प्राप्त जयेश गुणवंत मोरे व छत्रपती पुरस्कार प्राप्त नेहा देशमुख यांना स्नेहसंमेलनाचा मान देण्यात आला. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आले. अध्यक्ष प्राचार्य डॉ एल.पी. देशमुख, उपप्राचार्य प्रा डॉ के. बी.पाटील,प्रा.संजय पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ एन. जे. पाटील, संमेलन प्रमुख प्रा डॉ राहुल संदनशिव उपस्थित होते. यावेळी विविध परीक्षांमधील गुणवंत तसेच स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.