जळगाव ( प्रतिनिधी ) – क्षयरोग बरा होणारा असला तरी समाजमनात भीती आहे. संपूर्ण जिल्ह्यात क्षयरूगण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत या आजाराबाबत लोकांची भीती दूर करून त्यांचे मनोधैर्य वाढवावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा क्षयरोग शोध मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक नागोजीराव चव्हाण, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.इरफान तडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा समन्वयक (पीएम) किरणकुमार निकम, डीपीएस विलास पाटील , पारोळा येथील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा क्षयरोग कर्मचारी निलेश भंगाळे, नितीन पाटील, सचिन सपकाळे, किशोर मराठे ,संजय पाटील, उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तडवी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्ण शोध मोहीम चा पहिला टप्पा 15 ते 25 नोव्हेंबर पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे जिल्ह्यातील 15 तालुक्यात 75 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका अशा 737 टीमच्या माध्यमातून पाच लाखाच्यावर नागरिकांचे निरीक्षण नोंदवले जाणार असल्याचे सांगितले
अपर जिल्हाधिकारी श्री महाजन यांनी क्षयरूग्ण दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राबविला जाणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला चार वर्षांपासून पारोळ्याच्या कुटीर रुग्णालय अंतर्गत सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व सचिव आशा पाटील यांनी क्षयरोग निर्मूलन शोधमोहिमेत सहभाग घेत अनेक गृहभेटी देऊन संशयित रुग्ण शोध मोहिमेत सहभाग घेतला आहे. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी या संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले.