रावेर तालुक्यात पाल येथील घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाल येथील ‘दिक्षा कृषी केंद्रात’ शिरलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी काउंटरच्या ड्रॉवरमधून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश मानसिंग पवार (वय ३३, रा. पाल) यांचे पाल गावात दिक्षा कृषी केंद्र आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास तीन अज्ञात इसम दुकानात आले. त्यापैकी दोघांनी फिर्यादीचे लक्ष विचलित केले, तर एकाने काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या १ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांचे एक बंडल शिताफीने चोरून नेले. याप्रकरणी ४ मार्च रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील हे करीत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









