मान को नम्रता से जितों! मान, अभिमान, अहंम्, घमेंड, मद हे सर्व एक प्रकारचे मनोविकारच आहेत. स्वतःला उच्च दाखविण्यासाठी दुसऱ्याला तुच्छ समजू नये. ज्या शाश्वत गोष्टी नाही त्यांचा अभिमान बाळगणे व्यर्थ असते. जैन आगम मध्ये जाती, कुल, ज्ञान, रुप लावण्य, ऐश्वर्य, धन, वैभव लाभ असे १० प्रकारचे मद सांगण्यात आलेले आहेत. अहंकाराला प्रोत्साहन देणारे मद होय. क्रोध, मान, माया आणि लोभ मुक्त जगायला हवे असे आवाहन .पू. सुमितमुनिजी म. सा. यांनी पर्युषण पर्वाच्या विशेष प्रवचनातून केले.
आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी छोटा अहंकार दडलेला असतो. मी अमुक करणार नाही ही प्रवृत्ती जागृत करणारा आहे. मी वंदन करणार नाही! हा अभिमान असतो. तू वंदन केले नाही तर तुलाही कुणीच वंदन करणार नाही हे ध्यानात ठेवायला हवे. मी आहे म्हणून हे सगळे सुरू आहे परंतु हा व्यर्थ अभिमान आपण बाळगून असतो. त्यासाठी एक उदाहरण देण्यात आले. मी कामाई करतो म्हणून माझे घर चालते असा एका व्यक्तीच्या मनात अभिमान होता. एका संताची त्या व्यक्तीशी चर्चा झाली. एक महिना परिवारापासून दूर रहा असा सल्ला संत देतात. एका महिन्यात मोठा मुलगा नोकरीला लागतो, मुलीचे लग्न होऊन जाते. एका महिन्यात परिवाराचे होती त्याहून चांगली परिस्थिती त्या परिवाराची झाली. एका महिन्याने तो पुन्हा परिवारात आला तर त्याची गरज कुटुंबाला राहिलेली नव्हती. त्याच्या शिवाय देखील परिवार चालतो हे त्याला समजते आणि त्याचा अभिमान चूर चूर होतो. त्यामुळे क्रोध, मान, माया आणि लोभ मनात बाळगू नये असे आवाहन करण्यात आले. या प्रवचना आधी गजसुकुमार यांच्याबद्दल प.पू. ऋजुप्रज्ञ मुनीजी तर श्रेणिक राजा आणि त्याचा पुत्र अभयकुमारची गोष्ट प.पू. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी सांगितली.