जळगाव (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विविध संघ स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे राजभवन यांच्या मार्गदर्शनाने दि. ४ ते ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी दि. ३ डिसेंबर रोजी रवाना झाले.
विद्यापीठाचे खो-खो (पु. व म.), व्हॉलीबॉल (पु. व म.), बास्केटबॉल (पु. व म.), कबड्डी (पु. व म.), मैदानी (पु. व म.), बॅडमिंटन (पु. व म.), टेबल टेनिस (पु. व म.), बुध्दीबळ (पु. व म.) ह्या विविध संघातील ८१ पुरूष व ८१ महिला असे एकूण १६२ खेळाडू राजभवन यांच्या मार्गदर्शनाने दि. ४ ते ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे रवाना झाले आहेत. त्यात संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक प्रा. आर.आर. सोनवणे, अमर हटकर, डॉ. राहूल कांबळे, प्रा. बालाजी सलगर, डॉ. नरेश बागल, डॉ. गोविंद मारतळे, डॉ. देवदत्त पाटील, प्रा. कुणाल चव्हाण, डॉ. शैलेश पाटील, डॉ.विजय पाटील, प्रा. क्रांती क्षीरसागर, प्रा. जुनेद काझी, डॉ. मुकेश पवार सोबत जाणार आहेत. यासंघाना व खेळाडूंना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्या प्रा. सुरेखा पालवे व कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी शुभेच्छादिल्यात. अशी माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी कळविले आहे.









