भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील अंबिकानगर भागात ४० वर्षीय ट्रक चालक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. १६ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप वसंत पाटील (वय ४०, रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. संदीपची पत्नी माहेरी निघून गेली आहे. सध्या तो एकटाच राहत होता.(केसीएन)गेल्या काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. याबाबत संदीप पाटील यांचे काका एकनाथ पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसात माहिती दिली. त्यात शुक्रवारी त्यांच्या बंद घरातून दुर्गंधी येत होती. यामुळे एकनाथ पाटील व मुलगा गजानन पाटील यांनी जावून पाहिल्यावर संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले.
मृतदेह भुसावळ येथिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला होता. घटनेप्रकरणीभुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार नितीन चौधरी करत आहेत. संदीप पाटील याच्या मृत्यूमुळे कुऱ्हे पानाचे गावात शोककळा पसरली आहे.