जळगाव ( प्रतिनिधी ) – अनोळखी नंबरवरून आलेल्या ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून दादावाडीतील फिर्यादीच्या क्रेडीटकार्ड नंबरचा वापर करून ३२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
मुकेश बाळकृष्ण गुरव (वय-४१, रा. गुजराल पेट्रोल पंपजवळ, दादावाडी ) हे खासगी वाहनाचे चालकाचे काम करून उदरनिर्वाह करतात. ३० ऑक्टोबररोजी सकाळी ते शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेशेजारी कामानिमित्ताने आले होते. त्यांना एका अनोळखी नंबरवरून मोबाईलवर फोन आला. एसबीआय क्रेडीट कार्डवरून बोलत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले होते. त्यानंतर त्यांना ३२ हजार ७८६ रूपये कट झाल्याचा मॅसेज आला. त्यांनी ॲप आणि स्टेटमेंटच्या माध्यमातून चौकशी केली असता ३२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुकेश गुरव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना रामभाऊ बडगुजर करीत आहेत.