चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील हॉटेल सदानंद परिसरात जुन्या भांडणावरून एकाला दोन जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण व कोयत्याने वार करून जखमी केले जीवे ठार मारण्याची धमकी दिली . या दोन जणांवर चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

चेतन अर्जुन वाघचौरे (वय-२६ , रा. वसंत चक्की चौधरीवाडा) कुटुंबियांसह राहतात. चेतन वाघचौरे कामावरून हॉटेल सदानंदजवळून १० ऑक्टोबररोजी रात्री अडीच वाजता दुचाकीने घरी जात आसतांना त्यांच्या गल्लीतील दत्तू मुकुंदा पवार (वय-३७), राहुल नाना सोनवणे (वय-२१, दोन्ही रा. चौधरी वाडा) यांनी रस्ता अडवला. जुन्या भांडणाचे नाव काढून चेतनला बेदम मारहाण केली. लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने चेतन वाघचौरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स पो नि दीपक बिरारी करीत आहे.







