एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मोहाडी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर तरुणाला धारदार कोयता घेऊन दहशत पसरवत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
सागर किरण बाविस्कर (वय २१ वर्ष, रा. समता नगर, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मोहाडी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर शुक्रवारी दि. १४ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी संशयित आरोपी सागर बाविस्कर हा धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.(केसीएन)त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपी सागर याला धारदार हत्यारासह जागीच ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार हे तपास करीत आहेत.