जळगाव बसस्थानक येथील घटना
मंगेश दयाराम बिऱ्हारी (वय ४० रा. राणीचे बांबरूड ता.पाचोरा) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून न्यायालयात ते नोकरीला आहे. शनिवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील बसस्थानक आवारात आलेले होते. त्यावेळी त्यांच्या खिश्यातील २५ हजार ५०० रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी सर्वत्र मोबाईलचा शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.