जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात गुरुवारी १३ जानेवारी रोजी दिवसभरात २७० बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर १४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
जळगाव शहर- ६६ , जळगाव ग्रामीण- ०२, भुसावळ – १३७ , अमळनेर- ० , चोपडा-०८ , पाचोरा -१० , भडगाव -०१ , धरणगाव -०३ , यावल- ०२ , जामनेर- ०२ , एरंडोल -०३ , रावेर-०४ , पारोळा – ०१, चाळीसगाव – १३ , मुक्ताईनगर -१४ , बोदवड – ०, आणि इतर जिल्ह्यातील ०४ असे एकुण २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार १६२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १२८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत.