जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे.गेल्या दोन दिवसातील अनुक्रमे १४ आणि १६ च्या तुलनेत ही संख्या दुपटीपेक्षाही जास्त वाढल्याने आता सावध राहावे लागणार आहे . आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – १७, , भुसावळ- ०९, , अमळनेर -०१ ,चोपडा-० ३, एरंडोल -०४ , चालीसगांव -०५ , असे एकुण ३९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ९०६ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत