नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र चाचणी केली असून 2017 नंतरची ही सर्वात मोठी चाचणी असल्याचं मानलं जात आहे. ही चाचणी रविवारी (30 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 07.52 (22:52 GMT) वाजता उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावर झाली असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे.जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या सर्वांनीच या चाचणीवर टीका केली आहे.ही या महिन्यातली त्यांची सातवी चाचणी आहे.संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर बॅलेस्टिक आणि अण्वस्त्रांच्या चाचणी करण्याबाबत बंदी घातलेली आहे. तसंच त्यांच्यावर कठोर निर्बंधही लादले आहेत.मात्र या देशानं वारंवार हे निर्बंध नाकारले असून किम जोंग उन यांनी देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
रविवारी झालेली चाचणी ही मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल (IRBM)ची होती असं, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. नोव्हेंबर 2017 नंतरची ही सर्वात मोठी क्षेपणास्त्र चाचणी असल्याचं सांगितलं जात आहे.