जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी महाराष् काँग्रेस ने राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून जळगाव शहर काँग्रेसने १ लाख स्वाक्ष-यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. आज जळगाव येथे या मोहिमेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डाॅ. उल्हास पाटील, निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या हातुन शुभारंभ केला.
याप्रसंगी एन एस यू आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, विजय वाणी, ज्ञानेश्वर कोळी, अमजद पठाण, जाकिर बागवान, मनोज सोनवणे, प्रदीप सोनवणे, बाबा देशमुख, मुजीब पटेल, वासुदेव महाजन, स्वप्नील साबळे, जगदीश गाढे दिपक सोनवणे, मनोज वाणी, उध्दव वाणी, आदी पदाधिकारी उपस्थित होते