धुळे (प्रतिनिधी ) ;- अखिल भारतीय कोळी समाज शाखा- उत्तर महाराष्ट्र विभागाच्यावतीने अँड. वसंत भोलानकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य प्रदीप नवसारे व प्रमिला चव्हाण विभागीय महिला अध्यक्षा यांचे उपस्थित कोरोनाचे नियम पाळून आघाव डी.एड. कॉलेज स्टेशन रोड धुळे येथे बैठक झाली .
बैठकीत मा.आमदार कांतीजी कोळी ,प्रदेश अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीचे महिला नियुक्तीचे पत्र महिला अध्यक्षा नंदुरबार जिल्हावृषाली योगेश सावळे , विभागीय चिटणीस कविता मासरे, विभागीय कार्याध्यक्षा लतिका गरुड , विभागीय उपाध्यक्षापदी उषा बाविस्कर, विभागीय अध्यक्ष प्राचार्य प्रदीप नवसारे व विभागीय महिला अध्यक्षा प्रमिला चव्हाण यांच्याहस्ते देण्यात आले. बैठकीला योगेश सावळे , देवा बापू कोळी ,रमेश निकम , वसंत सैंदाने सुभाष मासरे , कल्पना पीठे नाशिक , दीपक सोनवणे , प्रा.प्रविण सोनवणे, जितेंद्र अखडमल, मुकेश चव्हाण, तुषार नवसारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमेश निकम यांनी केले.