चाळीसगाव ( प्रतिनिधी:) – कोदगांव शिवारात शेडमध्ये बांधलेली २५ हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना आज उघडकीला आली चाळीसगाव तालुक्यात पशुधनाची चोरी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शेतकरी व दुग्ध व्यावसायिक हतबल झाले आहेत चोरट्यांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न आहे.
चाळीसगाव शहरातील कोदगांव येथील समाधान वामन चौधरी यांनी कोदगांव शिवारातील शेतातील शेडमध्ये जर्शी गाय रात्री बांधली होती अज्ञात इसमाने रात्रीत चोरून नेली. समाधान वामन चौधरी यांनी गायीची परिसरात शोधाशोध केली. मात्र गाय मिळून आली नाही. म्हणून जर्शी गाय अज्ञाताने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून समाधान चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरुन भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो नि के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना दिपक पाटील करीत आहेत.