जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील बळीराम पेठेत असणाऱ्या कोठारी क्लासेस या खासगी क्लास मध्ये शिकण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्याला होमवर्क न केल्याने अर्धनग्न उभे करून मारहाण केल्याप्रकरणी बाल न्याय अधीक्षक मंडळाच्या आदेशानुसार शिक्षिकेसह संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासगी क्लासचा होमवर्क न केल्याने एका नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेसह क्लासच्या चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शनीपेठेतील गुरूनानक नगरातील रहिवाशी योगेश गणेश ढंढोरे यांचा मुलगा हा कोठारी क्लासेस येथे शिकवणीसाठी गेला असता या ठिकाणी पल्लवी जितेंद्र इंदाणी रा. मगर पार्क वाघ नगर या शिक्षिकेने होमवर्क न केल्याने मुलाला अर्धनग्न करून मारहाण केल्याची तक्रार योगेश ढंढोरे यांनी दिली होती त्यानुसार सुरुवातीला अदाखलपात्र म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पीडित मुलाला बाल न्याय अधीक्षक मंडळाच्या आदेशानुसार अखेर शनिवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी शिक्षिका पल्लवी इंदाणी आणि कोठारी क्लासचे संचालक बिपीन शाह यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र सोनार करीत आहे.
===========================