जळगाव [प्रतिनिधी] – शहरातील ओंकार नगर परिसरातील खगी दवाखान्यासमोर एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी चौघा आरोपींना मंगळवारी अटक केली आहे.
एका तरुणाच्या अंत्यविधीवरून परतत असताना खुन्नस दिल्यावरून १३ सप्टेंबर रोजी उमाळे येथे दोन गटात गँग वार झाला होता. यात एकावर चॉपरने वार झाला होता. त्याला ओंकार नगरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.
दरम्यान, त्याच खाजगी दवाखान्या समोर एकावर आठ ते दहा जणांनी चॉपरने हल्ला केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील चार जणांना जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली आहे.
सोनू उर्फ कुलदिप पोपट आढळे (वय-२८) रा. समता नगर, मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ (वय-२२) रा. हुडको पिंप्राळा, अजय देवीदास सपकाळे (वय-२१) रा. बुध्दविहार हुडको पिंप्राळा आणि राकेश अशोक सपकाळे (वय-२२) रा. समता नगर अशी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार, पोहेकॉ जितेंद्र सुरवाडे, नाना तायडे, अविनाश देवरे यांनी कारवाई करत आज सकाळी संशयित आरोपी कुलदिप आढळे, मुकेश शिरसाठ, अजय सपकाळे, राकेश सपकाळे यांना अटक केली. पुढील कारवाई जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.