मुंबई / वृत्तसंस्था – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पास करा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सूचनांविषयी राज ठाकरेंनी सांगितलं.
शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीही करा. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, माहिती नाहीत. ही पोरं तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.
तुम्हाला आखूड शिंगी, बहुदुधी, कमी चारा खाणारी गाय मिळणार नाही. आता ट्यूशनच्या फी बघायच्या, की मुलांच्या मनावर झालेला परिणाम बघायचा, मग त्यावर बोंबा मारणार, असं राज ठाकरे म्हणाले.







