जिल्हा सामान्य रुणालयातील प्रकार ; नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना
जळगाव ;- येथेही जिल्हा सामान्य रुग्णालयात वारंवार दिवसभर रुग्णालयात ठाण मांडून बसणारे तथाकथित आरोग्य दूत हे मात्र कोरोना आजाराच्या पार्शवभूमीवर दिसेनाशे झाल्याचे चित्र गेल्या आठ दिवसांपासून दिसून येत आहे . सध्या कोरोनाची लागण सुरु असल्याने अनेक नागरिक आपणास सर्दी खोकला आणि ताप आल्याने कोरोना तर झाला नाही म्हणूनही अनेक जण गर्दी करीत असले तरी त्यांना एरव्ही मग्दार्शन करणारे आरोग्यदूत मात्र गायब असल्याचे एका डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले . त्यामुळे अशा कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे आरोग्यदूत पुढे का सरसावत नाही असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे . तसेच आज कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी नेत्र कक्षाजवळ हलविण्यात आला आहे.
———————–