जळगाव : एका कार्यक्रमासाठी मित्राला थोड्या वेलांटी येण्याचे आश्वासन देऊन गेलेल्या मित्राने काही वेळातच गळफास घेतल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून नीलेश दगडू वाघ (२०) असे मयत तरुणाचे नाव आहे . नीलेश याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र तो पोलिसांच्या रेकॉर्डवर होता.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , नीलेश वाघ हा स्लाईडींगचे दरवाजे व खिडक्यांचे हातमजुरीवर कामे करायचा. शनिवारी गल्लीत कार्यक्रम असल्याने सकाळी ७.३० वाजता शेजारचा मित्र नीलेशला घरी बोलावण्यासाठी गेला. त्यावेळी थोड्यात वेळात येतो असे त्याने सांगितले. ९ वाजले तरी नीलेश आला नाही म्हणून हा मित्र परत बोलवायला गेला असता त्याने घरात मुलींच्या स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतलेल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच बाहेर धुणीभांडी करायला गेलेली आई धावतच आली. मुलाला पाहून तिने एकच हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुधीर साळवी, मुदस्सर काझी यांनी घटनास्थळ गाठून तरुणांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
.त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक गुन्हाही दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, मिलींद सोनवणे, सदानंद नाईक यांनी पंचनामा केला.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







